Saturday, August 22, 2026
Google search engine

विरुरवर शोककळा विरुरच्या युवा कॅटरिंग व्यावसायिक विशाल जिवतोडे यांचा अपघातात दुर्देवी मृत्यू

लोकशाही आवाज संपादक

रामअवतार गुलाबचंदजी सोनी

विरुर :- विरुर येथील रहिवासी व युवा कॅटरिंग व्यावसायिक विशाल केशव जिवतोडे (वय २६) यांचा राजुरा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पोहोचताच विरुर परिसरात शोककळा पसरली.विशाल जिवतोडे यांनी कॅटरिंग व्यवसायात स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यवसायात मोठे यश मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबासह मित्रपरिवार आणि व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.विशाल हे वीर मराठा गणेश मंडळाचे अध्यक्ष होते. तसेच शेतकरी संघटनेचे माजी आमदार वामनराव चटप यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती. मनमिळावू स्वभाव, सामाजिक बांधिलकी आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे ते युवकांमध्ये लोकप्रिय होते.विशाल हे आई-वडिलांचे एकुलते एक चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण विरुर गावात हळहळ व्यक्त होत असून विविध सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Ramawtar Soni
Lalitkumar Soni
Gaurav Ragit
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular