मुख्य संपादक
रामअवतार सोनी
आज दि. ५-सप्टेंबर श्री डॉ.सर्वपल्ली राधाकॄष्ण यांचे जन्मदिवस निमित्त दर वर्षी शिक्षक दिवस साजरा केला जातो. याचच औचित्य साधत गुरूनानक शाळेत आज शिक्षक दिवस आयोजीत करण्यात आला.
कार्यक्रमाचा आधी विद्यार्थ्यां कडुन स्वंय शासनाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचा आरंभ सावित्रीबाई फुले व डॉ.सर्वपल्ली राधाकॄष्णन समक्ष द्विप प्रज्वलीत करून व त्यांना विनम्र अभिवादन करून शुरू करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री पि.एम.धानोरकर सर तर प्रमुख पाहुने श्री केशव ठाकरे सर व सुभाष शेंडे यानीं दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची शुरूवात केली.
शिक्षक दिना निमित्त काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळा व्यवस्थापण समिती चे उपाध्यक्ष श्री ललित कुमार सोनी, माता पालक संघाची अध्यक्ष ममताताई सोनी, सखी सावित्री समितीची सचिव सौ. वैशाली वडस्कर, सदश्य सुवर्णा ठमके आदी उपस्थित होते.



