संपादक
सचिन बल्की
धानोरा येथे अंदाजे ३५ वर्षीय इसमाचा मच्छी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
सदर इसमाचे नाव गुरुदास लखू टेकाम असून त्याच्या पश्चात दोन मुली व पत्नी असा आप्तपरिवार आहे.
सदर इसम काल संध्याकाळ पासून आपल्या घरी आला नव्हता.गावातील नागरिक अविनाश जेनेकर,परशुराम टेकाम, प्रकाश बल्की यानीं परिसरात शोध घेतला असता मच्छी तलाव जवळ चप्पल दिसून आल्याने तलावात शोध घेतला असता सदर इसमाचे शव आढळून आले. काल सायंकाळी घराकडे येत असताना तलावाच्या काठावरून पाय घसरून मृतक तलावात बुडाला अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. तलावातील गाळात पाय फसल्याने बाहेर येता आले नाही, परिणामी पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.असा प्राथमीक अंदाज गावक-याकडुन होता आहे.घटनास्थळी विरूर पोलीसांनी पंचनामा करून मृतकाचे शव उत्तरीय तपासणी करीता राजुरा येथील उप रूग्णालयात नेण्यात आले आहे.
विरूर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास थानेदार स.पो.निरिक्षक संतोष वाकडे करित आहे.



